कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे न्यायासाठी १० जूनपासून उपोषण

कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे न्यायासाठी १० जूनपासून उपोषण
railway

कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे न्यायासाठी १० जूनपासून उपोषण

 

रत्नागिरी (प्रतिनिधी) :

कोकण रेल्वेमधील प्रकल्पग्रस्तांना कोकण रेल्वेच्या सन २००५ पासून वेळोवेळी निघालेल्या अधिसूचनानुसार आवश्यक त्या परीक्षां उत्तीर्ण असूनही त्यांना डावलण्यात आल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची भावना आहे. न्याय मिळविण्यासाठी कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. सोमवार, दि. १० जून रोजीपासून बेलापूर येथील कोकण रेल्वे महामंडळाच्या मुख्य कार्यालयासमोर हे उपोषण करण्यात येणार आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी प्रकल्पग्रस्तांच्या या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. अनेक वर्षांपासून डावलण्यात येत असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची भावना आहे. न्याय मिळत नसल्याने आम्हाला बेमुदत उपोषणासारखा मार्ग पत्करावा लागत आहे. हे उपोषण सोमवार दि. १० जून रोजीपासून बेलापूर येथील कोकण रेल्वे महामंडळाच्या मुख्य कार्यालयासमोर करण्यात येणार असल्याची माहिती कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी दिली आहे.