कल्याण रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेसाठी सरसावले संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन

कल्याण रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेसाठी सरसावले संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन
cleaning

कल्याण (प्रतिनिधी) :

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्यावतीने कल्याण रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा हरदेवजी महाराज यांच्या आदेशाने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनने रेल्वे प्रशासनाच्या सहयोगाने कल्याण रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

कल्याण रेल्वे स्थानकात स्टेशन प्रबंधक  पी.के.दास आणि कल्याण सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे, रेल्वेचे अधिकारी विनोद रोकडे यांच्या उपस्थितीत या अभियानाला सुरुवात करण्यात आली. कल्याण रेल्वे स्थानकावर हे अभियानराबविण्यासाठी पूर्वनियोजित आखणी केल्यानुसार रेल्वे आरक्षण कार्यालय, लोकल तिकीट कार्यालय तसेच प्लॅटफॉर्म क्र. १ ते ७, रेल्वेचे तिन्ही ब्रिज, स्काय वॉक आदींची स्वच्छता करण्यात आली. कल्याण स्थानकाच्या स्वच्छता मोहिमेमध्ये कल्याण,कोनगाव, सरवली, रांजनोली, पिंपळास, पिंपळनेर, नेतिवली, नेताजी नगर, नांदिवली, द्वारली, बुर्दुल, माणेरा, रामनगरी, पिसवली, मिलिंदनगर आदी परिसरातील सुमारे ३००  निरंकारी सेवादल, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवकतसेच भक्तगणांनी भाग घेतला.

भारतीय रेल्वेमधील महत्त्वाचे स्टेशन म्हणून कल्याणची ओळख असून दररोज सुमारे साडेपाच ते साडेसात लाख लोकं याठिकाणी ये जा करतात.  यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा होत असतो. हि साफ सफाई करण्यासाठी स्वच्छता कर्मचारी तर असतातच मात्र आज संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांना आणि सेवादल सदस्यांना स्वच्छता करताना पाहून सामान्य नागरिकांमध्ये एक प्रकारे कुतहूल निर्माण झाले असून त्यांनाही आपले स्टेशन स्वच्छ ठेवावे असे वाटत असल्याचे मत स्टेशन प्रबंधक पी.के. दास यांनी व्यक्त केले. यावेळी रेल्वे स्थानक परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले. कल्याणचे स्टेशन प्रबंधक पी.के.दास यांनी संत निरंकारी चॅरिटेबलफाउंडेशनला प्रशस्तीपत्र देऊन या कार्याबद्दल अभिनंदन केले.