नागरिकांनी पुढाकार घेतल्यास ठाणे शहर पर्यावरणभिमुख होईल - संजीव जयस्वाल

नागरिकांनी पुढाकार घेतल्यास ठाणे शहर पर्यावरणभिमुख होईल - संजीव जयस्वाल

ठाणे (प्रतिनिधी) : 

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाबरोबरच खारफुटीची लागवड, वृक्षांचे पुनर्रोपण, प्लास्टिकपासून इंधननिर्मिती, कचऱ्याचे वर्गीकरण त्यावर प्रक्रिया करणे आदी विविध उपक्रम ठाणे महापालिकेच्या विविध विभागांच्या माध्मयातून राबविले जात आहे. शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून ती माझी स्वत:ची देखील जबाबदारी आहे असा विचार जेव्हा नागरिक करतील तेव्हाच खऱ्या अर्थाने ठाणे शहर हे पर्यावरणभिमुख होईल. महापालिका प्रशासन हे शहराचे एक चाक असून दुसरे चाक नागरिक आहे, त्यांनी महापालिकेस सहकार्य केले तर भविष्यात पर्यावरणदिन खऱ्या अर्थाने साजरा होईल, असा विश्वास ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जागतिक पर्यावरणदिनी व्यक्त केला.

ठाणे महापालिकेच्या प्रदूषण विभागाच्या वतीने  जागतिक पर्यावरण दिनाचेआयोजन घाणेकर मिनी थिएटरयेथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती राम रेपाळेशिवसेना गटनेतेदिलीपबारटक्के, अतिरिक्त आयुक्त  समीर उन्हाळेउपायुक्त संदीप माळवी,  अशोक बुरपल्लेओमप्रकाश दिवटेवर्षा दिक्षीत, नगर अभियंता रविंद्र खडताळे आदी मान्यवर होते.      

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास होत असताना विकासकामात अडथळा ठरत असलेली झाडे न तोडता त्यांचे पुनर्रोपण केले जात आहे, तसेच विकसकाने एक झाड तोडल्यास त्या बदल्यात त्यांच्याकडून पंधरा झाडे  लावून घेतली जात आहे. आजपर्यत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ११ लक्ष इतकी झाडे लावण्यात आली आहेत. महापालिका घनकचऱ्याचे वर्गीकरण करुन त्यावर प्रक्रिया केली जात आहे, येत्या दोन वर्षात कचऱ्यावर वेगवेगळया प्रक्रिया करुन कचरा समस्या सोडविणारे शहर म्हणून ठाणे शहराची ओळख ही आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण होईल असा विश्वासही आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्य्क्त केला.

यावेळी प्रदूषण विभागाच्या वतीने हरितवाटिका उभारणी, प्लास्टिक व थर्माकोल या वस्तूंना पर्यायी वस्तूंबाबत माहिती देणाऱ्या पचे, महिला बचत गटांना प्रशिक्षण देवून कापडी पिशव्या तयार करणे, पाण्याची गुणवत्ता राखणाऱ्या मशीनची उभारणी, शाश्वत ध्येय प्रणाली राबविणे, स्मार्ट वॉटर मिटर आदीचे उद्घाटन स्थायी समिती सभापती राम रेपाळे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  पर्यावरणाबाबत लिसामेड टेक्नॉलॉजीचे शशीन शहाजैवविविधतेबाबत डॉ. दिप्ती शर्मा, टाकावू वस्तूपासून पुर्नवापर याबाबत स्वत्व सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी श्रीपाद भालेराव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ठाणे महानगरपालिका, ठाणे स्मार्ट सिी लि. व डी जी ठाणे यांच्या समन्वयाने शाश्‌वत विकास ध्येये याबाबत जनजागृतीकरिता वेबिनार सिरीज आयोजित केली होती. या सिरिजला अद्यापर्यत ३८ हजार नागरिकांनी भेट दिली असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेने राबविलेल्या विविध प्रकल्पामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांचा तसेच शास्त्रोक्त पध्दतीने कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या गृहनिर्माण संकुलांच्या प्रतिनिधींचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.