केडीएमसी कर्मचाऱ्यांना १५ हजार सानुग्रह अनुदान 

केडीएमसी कर्मचाऱ्यांना १५ हजार सानुग्रह अनुदान 

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी १५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान घोषित केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने केलेल्या या घोषणेबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

गतवर्षी कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यावर्षी कोरोना साथीच्या आपत्कालीन परिस्थितीत यावर्षी कोरोना साथीच्या आपत्कालीन परिस्थितीत महापालिका कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत करून  खूप चांगले काम केले आहे, अश्या शब्दात कर्मचाऱ्यांची प्रशंसा करीत गतवर्षी पेक्षा १ हजार रुपये  जास्त म्हणजेच १५ रुपये हजाराचे सानुग्रह अनुदान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर विनिता राणे यांनी मंगळवारी पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत जाहीर केले. या सानुग्रह अनुदानाचा फायदा महापालिकेतील व परिवहन विभागातील सुमारे ६३७६ स्थायी, अस्थायी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना होणार असल्याने कर्मचारीवर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

सदर बैठकीला पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सभापती स्थायी समिती विकास म्हात्रे, विरोधी पक्ष नेते राहुल दामले, सभागृह नेते प्रकाश पेणकर, भाजपा गटनेते शैलेश धात्रक, मनसे गटनेते मंदार हळबे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त उमाकांत गायकवाड, लेखाधिकारी विनय कुलकर्णी आदी उपस्थित होते.