टिटवाळयातील ७ खेळाडूंना कराटे खेळात ब्लॅक बेल्ट

टिटवाळयातील ७ खेळाडूंना कराटे खेळात ब्लॅक बेल्ट

कल्याण (प्रतिनिधी) : किमुरा शुकोकाई कराटे असोसिएशन (इंडिया) यांच्या वतीने मोहन मार्शल आर्ट्स आणि फिटनेस प्लॅनेट, खडकपाडा, कल्याण येथे रविवारी कराटे या खेळात ब्लॅक बेल्ट परीक्षा आयोजीत करण्यात आली होती. कल्याण, डोंबिवली, कोनगाव आणी टिटवाळा येतील २२ कराटेपटू या परीक्षेत सहभागी झाले होते.

टिटवाळा येथील विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन येथे मुख्य प्रशिक्षक विनायक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असलेल्या ७ कराटे खेळाडू मृण्मयी भोजने, भुषण जाधव, संदेश देवरे, मधुरा सुपल, यश राठोड, राजरत्न साळवे आणि गणेश रायते या परीक्षेत सहभागी झाले होते. सर्व खेळाडूंना गेल्या ३ ते ४ वर्षात कराटे या खेळात संपादन केलेले सर्व कौशल्ये याचे प्रात्यक्षिक तसेच विविध शारीरिक आणि मानसिक चाचण्यामध्ये स्वतःला सिद्ध करावे लागते. या सर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करुन टिटवाळ्यातील खेळाडूंनी प्रथम प्रयत्नात ब्लॅक बेल्ट संपादन केला. या परिक्षेसाठी राज्य युवा पुरस्कार विजेते व मुख्य कराटे प्रशिक्षक विनायक कोळी, हरीष वायदंडे आणि गौरी तीटमे हे प्रशिक्षक खेळाडूंसोबत उपस्थित होते.

किमुरा शुकोकाई कराटे असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक मोहन सिंग  यांनी सर्व खेळाडूंची परीक्षा घेतली व या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व खेळाडूंची यादी जाहीर केली. या ७ ब्लॅक बेल्ट खेळाडूंमुळे टिटवाळयाच्या क्रीडा विश्वात आणखी भर पडली आहे.