`एक दिवस कायस्थांचा' एक चांगला धार्मिक समारोह - सुशिलकुमार शिंदे

`एक दिवस कायस्थांचा' एक चांगला धार्मिक समारोह - सुशिलकुमार शिंदे

ठाणे (प्रतिनिधी)  : 
एकविरा गडावरील `एक दिवस कायस्थांचा' या समारोहामुळे प्रथमच आपल्याला एकविरा देवी दर्शनाचा योग आला व एक चांगला कार्यव्रâम पाहून धन्यता वाटली, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

सीकेपी संस्थेच्या पुढाकाराने यावर्षीही एकविरा गडावर `एक दिवस कायस्थांचा' सोहळा नेहमीच्या उत्साहाने पार पडला. उत्सवासाठी माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, उज्वला शिंदे, आ. प्रणिती शिंदे, अपना बाजारचे निलेश वैद्य, सुरेखा कुळकर्णी, ठाण्याचे माजी नगरसेवक गिरीश राजे, स्थानिक भाजपा नेते मिलिंद बोत्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

एकविरा गडावर आज पहिल्यांदाच आपण आलो आहोत. यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर येणार होतो. परंतु योग आला नाही. सीकेपी समाज एक स्वाभिमानी समाज म्हणून संपूर्ण जगात ओळखला जातो. अनेक नररत्ने या समाजाने देशाला दिली आहेत. आपली पत्नी व मुली एकविरेला नेहमी येतात. आज सीकेपी समाजाच्या कार्यव्रâमानिमित्ताने प्रथमच आलो व एक चांगला कार्यक्रम अनुभवत धन्य झालो, असेही सुशिलकुमार शिंदे यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला प्रत्येक वेळी पाठींबाच दिला आहे. मुख्यमंत्री होत असतांना बाळासाहेबांनी केलेल्या मदतीचा सुशिलकुमार शिंदे यांनी आर्वजून उल्लेख केला.

यावर्षीचे प्रथमच एकविरा गडावर देवी समोरील मोकळ्या जागेत मंडप व व्यासपिठ उभारण्यात आले होते. यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण एकविरेची पालखी होते. गडाच्या पायथ्यापासून निघालेली पालखी वाजतगाजत गडावर दाखल झाली. त्यानंतर अनेक उपस्थितांनी पालखी दर्शन घेत नाचविली. उत्सवासाठी देशाच्या विविध भागातून सीकेपी ज्ञाती बंधूभगिनी उपस्थित होते.