कोकण रहिवासी मंडळाचा गरजू सदस्यांना मदतीचा हात

कोकण रहिवासी मंडळाचा गरजू सदस्यांना मदतीचा हात

टिटवाळा (प्रतिनिधी) : कोविड १९ आजाराच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिक घरात अडकून पडले आहेत. रोजगार बंद, घरातील संपुष्टात आलेले अन्नधान्य यामुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ ओढवली असताना टिटवाळा येथील कोकण रहिवासी मंडळाने गरजू सदस्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यासाठी हात पुढे केला आहे.

कोकणातील हजारो कुटुंबे टिटवाळा शहर आणि परिसरात नोकरी-शिक्षणाच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असताना कोकणातील आपल्या गरजू बांधवांना मदतीसाठी कोकण रहिवासी मंडळ, टिटवाळा या संस्थेचे अध्यक्ष यशवंत परब (बुआ) आणि त्यांचे सहकारी पुढे सरसावले आहेत. मंडळाच्या वतीने गरजू सदस्यांची माहिती घेऊन त्यांना अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात येत असल्याची माहिती परब यांनी दिली आहे. या कामासाठी मंडळातील दानशूर मान्यवर मदत करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.