कल्याण-डोंबिवली येथील आपचे पदाधिकारी जाहीर

कल्याण-डोंबिवली येथील आपचे पदाधिकारी जाहीर

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक संपूर्ण ताकदीनिशी लढविण्याची तयारी आम आदमी पार्टीने चालविली असून त्यादृष्टीने काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय सहसचिव रुबेन मस्करेन्हास यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी आपचे कल्याण डोंबिवली महानगर अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड, ठाणे जिल्हा अध्यक्ष एम.एल. पचौरी, कल्याण पश्चिम शहर अध्यक्ष कोणार्क देसाई, उपाध्यक्ष रविंद्र केदारे, मिथिलेश झा यांच्यासह अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी महानगर अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांनी कल्याण डोंबिवली महानगर सचिवपदी किरण इंगळे, कल्याण पूर्व शहर उपाध्यक्षपदी डॉ. दत्तात्रय राजे, संघटकपदी कल्पेश आहेर, तर महिला उपाध्यक्षपदी अॅड. सुप्रिया कर्पे तर डोंबिवली शहर अध्यक्षपदी अमित दुखंडे यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर केले.

तसेच प्रभाग क्र. ४४ नेतिवली टेकडीच्या महिला अध्यक्षापदी कल्पना बारसे, प्रभाग क्र. ८९ मंगल राघो नगरच्या महिला अध्यक्षापदी लता शें, प्रभाग क्र. ९१ जरीमरी नगरच्या महिला अध्यक्षापदी सारिका खांडे, प्रभाग क्र. ९ मांडा पूर्व अध्यक्षपदी उमेश परब, प्रभाग क्र. १० टिटवाळा गणेश मंदिरच्या अध्यक्षपदी अॅड. संगीता जैस्वार तर उपाध्यक्षा वैष्णवी शिर्के यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.