केडीएमसीच्या निवडणूकीसाठी आपची प्रचार समिती घोषित

केडीएमसीच्या निवडणूकीसाठी आपची प्रचार समिती घोषित

डोंबिवली (प्रतिनिधी): कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची वेळापत्रक कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित असले तरी आम आदमी पार्टीने या निवडणुकीच्या दृष्टीने सक्रीय झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी निवडणूक प्रचार समिती घोषित करीत आपने समितीचे अध्यक्षपदी अॅड. धनंजय जोगदंड यांची नियुक्ती केल्याचे वृत्त आहे.

कल्याण येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत सदर समिती निवडण्यात आली. यासंदर्भात आपचे प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी एका पत्राद्वारे सदर समितीची अधिकृत घोषणा केली आहे. समितीचे उर्वरित पदाधिकारी पुढीलप्रमाणे- समितीचे प्रभारी रुबेन मस्करेन्हास, सहसंयोजक- लक्ष्मिकांन्त केरकर, सहसंयोजक/ मिडिया सल्लागार –किरण मेस्त्री, सहसंयोजक- मिथिलेश झा, सचिव- आकाश वेदक, सहसचिव- प्रवीण कुरले, रवींद्र केदारे, हमजा हुसेन, संदीप नाईक, कोषाध्यक्ष- आशिष मिश्रा, सहकोषाध्यक्ष- सिद्धार्थ गायकवाड, सहसचिव (सोशल मिडिया)- तेजस नाईक, धनंजय उपाध्याय, सिद्धांत गायकवाड.