कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक आप पूर्ण ताकदीनिशी लढविणार!

कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक आप पूर्ण ताकदीनिशी लढविणार!

कल्याण (प्रतिनिधी) : आम आदमी पार्टीच्या कल्याण पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय सहसचिव रुबेन मस्करेन्हास यांच्या हस्ते काटेमानिवली नाका येथे करण्यात आले. यावेळी मस्करेन्हास यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक आप पूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याचे जाहीर केले.

यावेळी आपचे कल्याण डोंबिवली महानगर अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड, ठाणे जिल्हा अध्यक्ष एम.एल. पचौरी, कल्याण पश्चिम शहर अध्यक्ष कोणार्क देसाई, उपाध्यक्ष रविंद्र केदारे, मिथिलेश झा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सीमा तिवारी, महिला जिल्हाध्यक्षा नीलम व्यवहारे, रवी जाधव, तेजस नाईक, संजय कुऱ्हाडे आदी उपस्थित होते. अॅड. जोगदंड यांनी कल्याण-डोंबिवलीकर जनतेला दिल्लीच्या धर्तीवर चांगल्या व दर्जेदार नागरी, आरोग्य व शाळा यासारख्या सुविधा देण्यासाठी आम आदमी पक्ष कटिबद्ध असल्याचे सांगत त्यासाठी चांगल्या लोकांनी आपमध्ये आले पाहिजे, असे आवाहन केले.