मनसे आमदार राजू पाटील यांची गणेश मंदिरात आरती

मनसे आमदार राजू पाटील यांची गणेश मंदिरात आरती

डोंबिवली (प्रतिनिधी) : डोंबिवलीतील प्रसिद्ध श्री गणेश मंदिर सकाळी भाविकांसाठी खुले करण्यात आले. मनसे आमदार राजू पाटील यांनी मनसैनिकां सोबत गणेश मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर दुर्गा पूजा करत आरती केली.

यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, कोणत्याही पक्षाची नाही तर जनभावना लक्षात घेता मंदिर उघडण्याची मागणी होत होती. उशिरा का होईना पण सरकारला जाग आली, मंदिर उघडली त्याबद्दल सरकारचे आभार मानतो. तर राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याची भरपाई सरकारने दयावी. त्वरित पंचनामे करावे, पंचनाम्याच्या आधी ही शेतकऱ्यांना काही रक्कम दयावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी शहर अध्यक्ष मनोज घरत, महिला शहर अध्यक्ष मंदा पाटील, कोमल पाटील, विधार्थी सेना शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे उपस्थित होते.