अभिजीत धुरत यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला नवी मुंबईत उभारी

अभिजीत धुरत यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला नवी मुंबईत उभारी

नेरूळ (प्रतिनिधी) : नवी मुंवईतील सामाजिक व रेल्वे कार्यकर्त अभिजीत धुरत यानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे याच्या शुभहस्ते नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. 

धुरत यांच्या पक्ष प्रवेश प्रसंगी अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष सुलतान मालदार, रूजान चिलवन हे पदाधिकारी उपस्थित होते. गेली २५ वर्ष विविध सामाजिक कामे  बेधडकपणे करणारे तथा सर्वसामान्याशी नेहमी संपर्कात असणारे युवा नेते म्हणून अभिजीत धुरत यांची नवी मुंबईकरांना ओळख आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी पक्षाला संघटना मजबूत करण्यासाठी फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. धुरत यांनी नेरूळ वॉर्ड नं. ९१ मधून महापालिका निवडणूक लढवावी, ते नक्कीच नागरीकांना अपेक्षांना न्याय देतील अशी सर्वसामान्यांना आशा आहे.