कल्याणमध्ये हातगाड्यांवर कारवाई

कल्याणमध्ये हातगाड्यांवर कारवाई

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण पश्चिमेतील 'ब' प्रभागातील  बिर्ला कॉलेज परिसरात समूहात हातगाड्या उभ्या करणाऱ्या व्यावसायिकांवर गाड्या जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप याच्या आदेशाने धडक कारवाई करून मोक्याच्या  ठिकाणांने मोकळा श्वास घेतला  आहे.

कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरात एका इसमाने मोठ्या संख्येने हातगाड्या लावण्याचा सपाटा  त्यामुळे बिर्ला कॉलेज परिसर बकालपणा आला आहे. त्यांच्या गर्दीतून नागरिकांना रस्ता काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यासंदर्भात 'ब' प्रभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांना वारंवार येणाऱ्या तक्रारी आणि मुख्य रस्त्याच्या अडवणूक करणाऱ्या हातगाडीधारक आणि व्यावसायिकांवर नुकतीच धडक कारवाई करीत हातगाड्या जप्त केल्या आहेत. यावेळी पोलीस कर्मचारी आणि पालिकेचे पथक उपस्थित होते. दरम्यान, पालिका प्रशासनाने सातत्याने अशा प्रकारच्या कारवाईचा बडगा उभारल्यास मुख्य रस्ता अडवणूक करणाऱ्या हातगाडीधारकांना आणि समूहात उभ्या करणाऱ्या गावगुंडांना जरब बसेल, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.