ठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई

ठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई

ठाणे (प्रतिनिधी) : शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईतंर्गत मंगळवारी कळवा आणि माजीवडा-मानपाडा समितीमधील २ अनधिकृत बांधकामे जेसीबी व मनुष्यबळाच्या साहाय्याने निष्कसित करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली.

सदर कारवाईतंर्गत कळवा प्रभाग समितीमधील भुसार अळी आणि कुंभार अळी येथील दोन अनधिकृत तळ अधिक ८ मजल्याच्या इमारतीतील १४ खोल्यांचे बांधकाम निष्कासीत करण्यात आले. तसेच माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील बाळकूम पाडा नं.१ येथील स्टील्ट + ६ मजली अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची कारवाई करून इमारतीचे ३ मजले व २४ खोल्यांचे बांधकाम तोडण्यात आले.

सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उपायुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निष्कासनचे सहाय्यक आयुक्त फारुख शेख, सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे आणि कल्पिता पिंपळे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.