टिटवाळा येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई 

टिटवाळा येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई 

टिटवाळा (प्रातिनिधी) :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 'अ' प्रभागातील मांडा-टिटवाळा येथील अनधिकृत बांधकामावर ‘अ’ प्रभाग क्षेत्राच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकामार्फत कारवाई करण्यात आली असून अनधिकृत बांधकाम करणाऱ्या एका विरोधात एमआरटीपी कायद्यान्वाये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

गेल्या अनेक दिवसापासून 'अ' प्रभागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे निर्माण होत असल्याने लोकप्रतिनिधीसह महापालिका अधिकारीही प्रचंड हैराण झाले आहेत. मांडा-टिटवाळ्यातील नवनाथ सुतार यांनी एक अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते, तर टिटवाळ्यातील शेषमनी पांडे यांनीही तीन गाळे बांधले होते. यासंदर्भात प्रभाग अधिकाऱ्यांकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी कारवाईचा बडगा उचलला. अतिक्रमण नियंत्रण पथकाला घेऊन जेसीबीच्या सहाय्याने सदरचे बांधकाम तोडण्यात आले. प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांनी ही कारवाई केली.

टिटवाळ्यातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकांविरोधात महापालिका प्रशासनातर्फे टिटवाळा पोलीस ठाण्यात एमआरटीपी कायद्यान्वये रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. शेषमनी पांडे असे या बांधकामदाराचे नाव असून पोलीस उपनिरीक्षक मुंडे याप्रकरणी तपास करीत आहेत.