रूग्णालये, वैद्यकीय व्यवसाय, औषध दुकाने बंद राहिल्यास कारवाई

रूग्णालये, वैद्यकीय व्यवसाय, औषध दुकाने बंद राहिल्यास कारवाई

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहरामध्ये कोरोनाचा प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने तसेच सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य विषयक सेवा देणे अतिशय महत्वाचे असून जी नोंदणीकृत रूग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक, औषध दुकाने तसेच संबंधित आरोग्य विषयक खाजगी आस्थापना बंद राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत.

साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १९८७ ची राज्यात अंमलबजावणी सुरू असून या अधिनियमान्वये कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महापालिका आयुक्त हे सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या अधिनियमांतील तरतुदींद्वारे प्रदान केलेल्या अध्काराचा वापर करून श्री. सिंघल यांनी ठाणे शहरातील नोंदणीकृत रूग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक, औषध दुकाने तसेच संबंधित आरोग्य विषयक खाजगी आस्थापना बंद राहिल्याचे निदर्शनास आल्यास त्या आस्थापनांचे परवाने रद्द करण्याबरोबरच त्यांचेवर भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.