भातसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा 

भातसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा 

शहापूर (पंडीत मसणे) : 
भातसा धरणाची पाणी पातळी वाढल्यामुळे धरणाचे पाच दरवाजे आज सायंकाळी उघडण्यात येणार असून भातसा नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सतत पडत असलेल्या पावसामुळे भातसा धरणाच्या पाणी  पातळीत वाढ झाली आहे. धरणाची पाणी पातळी १३७.०५ मीटर एवढी वाढल्याने धरणाच्या संभाव्य पातळीत सतत वाढ होत आहे. त्यामुळे तलावातीळ जलाशय प्रचालन सुचीनुसार नियमित करण्यासाठी धरणाचे ०५ दरवाजे आज सायंकाळी पाच वाजेपासुन ०.५ मीटरने उघडण्यात येणार असल्याचे भातसा धरण व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे. 

धरणातून सुमारे १५५ क्युमेक्स (घनमीटर प्रति सेकंद) पाण्याचा विसर्ग प्रवाहीत केला जाणार आहे. त्यामुळे शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगांव पुलावरून तसेच नदी क्षेत्रालगत प्रवेश करु नये असा आजुबाजुच्या गावांना सतर्कतेचा इशारा व सुचना भातसा धरण व्यवस्थापन विभागाने दिला आहे.