ठाणे येथे कोविड योद्ध्यांना मास्क-सॅनिटायझरचे वाटप

ठाणे येथे कोविड योद्ध्यांना मास्क-सॅनिटायझरचे वाटप

ठाणे (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त  राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर सरचिटणीस संदीप जाधव यांच्या वतीने हजारो कविड योद्ध्यांना सॅनिटायजर आणि मास्कचे नुकतेच वाटप करण्यात आले.

जितेंद्र आव्हाड यांनी वाढदिवस साजरा न करण्याच्या सूचना देत असतानाच कोविड योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत संदीप जाधव यांनी  काजुवाडी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा पवार यांच्याकडे मास्क आणि सॅनेटायझर सुपूर्द करण्यात आले आणि वागळे इस्टेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  विजय ढोले  यांची भेट घेऊन पोलिस बांधवांकरीत मास्क आणि सॅनेटायझर देण्यात आले,तसेच काजुवाडी स्वच्छता केंद्र,जय भवानी नगर स्वच्छता केंद्र,जय भवानी नगर स्मशान भूमी, वागळे इस्टेट औषध फवारणी विभाग इत्यादी ठिकाणी भेट देऊन कर्मचारी आणि अधिकारी बांधवांसाठी मास्क आणि सॅनेटायझर वाटप करण्यात आले.

यावेळी माजीद मुलाणी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,ठाणे शहर अध्यक्ष  प्रफुल कांबळे, ब्लॉक अध्यक्ष दत्तात्रय जाधव, वॉर्ड अध्यक्ष तानाजी राऊत, नितीन पोटफोडे, अशोक डावरे, हेमंत बनसोडे, धम्मानंद आठवले आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.