कल्याण शहराच्या विकासासाठी कायम कटिबद्ध - नरेंद्र पवार

कल्याण शहराच्या विकासासाठी कायम कटिबद्ध - नरेंद्र पवार

कल्याण (प्रतिनिधी) : विकासाची गंगा शेवटच्या घटकांपर्यंत पोहचली पाहिजे. विविध योजनांचा माध्यमातून काम करत असतानाच माझ्या आमदार निधीतून कल्याण पश्चिममध्ये अनेक विकास कामे करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळी कामे मार्गी लागली. वडवलीच्या नागरिकांनी गणेश घाट सुशोभीकरण करण्याचा आणि मंदिर शेड साकारण्याचा विषय मांडला. त्यासाठी तातडीने निधी दिला आणि हे काम मार्गी लागले. शहराच्या विकासासाठी आपण कायम कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी वडवली येथे बोलताना व्यक्त केले.

प्रभाग क्रमांक ६, वडवली येथे गणेश घाट नूतनीकरण व सुशोभीकरण आणि गावदेवी मंदिर समोरील शेडच्या कामाचा लोकार्पण सोहळा माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी उपमहापौर तथा नगरसेविका उपेक्षा भोईर, नगरसेविका हर्षाली थविल, मोहोने-टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तीवान भोईर, परिवहन समितीचे माजी सभापती रमेश कोनकर, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष निखिल चव्हाण, महिला मोर्चा प्रदेश सचिव प्रिया शर्मा, नीरजा मिश्रा, मोहोने-टिटवाळा महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष मनीषा केळकर, मंडल सरचिटणीस संतोष शिंगोळे, अनंता पाटील, प्रमोद घरत, मोतीराम पाटील, हनुमान तरे, श्याम मुरकुटे, महिला मोर्चा उपाध्यक्ष प्रीती दीक्षित, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष संदीप पाटील, भावना मनराजा, सुनील शेट्टी, उमेश पिसाळ, तात्या ठुमकर, सदा कोकणे, शांता तरे आदी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.