कल्याण-डोंबिवलीत शुक्रवारी ३३ कोरोना रुग्णांची वाढ

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आज (शुक्रवारी) तब्बल ३३ रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आजच्या या ३३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येने चौथे शतक देखील पार करत ४२४ चा आकडा गाठला आहे.
शुक्रवारी आढळलेल्या ३३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील ८, कल्याण पश्चिमेतील ११, डोंबिवली पूर्वेतील ८, डोंबिवली पश्चिमेतील ४ आणि मांडा टिटवाळा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. एकाच दिवशी एवढे रुग्ण आढळल्याने लॉकडाऊनचे नियम अधिक तीव्र करण्याची मागणी जाणकार व्यक्त करत आहेत. यापैकी आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असून १६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल २४७ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.