डोंबिवली येथे उभे राहणार शवविच्छेदनगृह

डोंबिवली येथे उभे राहणार शवविच्छेदनगृह

कल्याण (प्रतिनिधी) :
डोंबिवली येथील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मागील बाजूकडील मोकळ्या जागेत शवविच्छेदनगृह उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला आहे.

तळमजला अधिक एक मजला आरसीसी बांधकाम असलेली ही इमारत असणार आहे. ती १४५ चौ.मी. क्षेत्रावर उभी राहणार आहे. तळमजल्यावर पंचनामा रूम, पोस्टमार्टेम रूम, मोर्चुरी रूम, व पहिल्या मजल्यावर व्हिसेरा व स्टाफ रूम असणार आहे. मागील कंपाऊंड भिंत पुनर्बांधणी, जनरेटर शेडही उभारले जाणार आहे. यासाठी १ कोटी ६४ लाख खर्चाचा अंदाज प्रशासनाचा आहे. कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातच एकमेव असलेल्या ह्या शवविच्छेदन गृहावरील ताण त्यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे.