एएसबी इंटरनॅशनलचे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० कोटी 

एएसबी इंटरनॅशनलचे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० कोटी 

मुंबई (प्रतिनिधी) : एएसबी इंटरनॅशनल प्रा. लि. अंबरनाथ, जि.ठाणे या कंपनीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९ या खात्यात दहा कोटी रुपयांची मदत जमा केली असून समाजाप्रतीचे आपले दायित्व दाखवून देताना शासनाबरोबर या विषाणू विरोधातील युद्धात आपला सहभाग नोंदवला आहे.

शंभर टक्के निर्यात करणारी ही कंपनी प्लास्टिक मोल्डिंग मशीन आणि साचे तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याशिवाय सॅनिटायझर, कफ सिरप, वॉटर ॲण्ड बेबी फिडिंग बॉटल्सची तसेच इतर बॉटल्सची निर्मितीही या कंपनीकडून केली जाते. त्यांची उत्पादने देशातील तसेच जागतिक बाजारपेठेमध्ये विकली जातात.  त्यांची पॅरेंट कंपनी असलेल्या जपानच्या निसेई एएसबी कंपनीने सात कोटी रुपयांची मदत प्रधानमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केल्याचेही कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी कळवले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एएसबी कंपनीच्या या मदतीबद्दल आभार व्यक्त केले आहेत. कोविड १९ साठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९ मध्ये आतापर्यंत २६५ कोटी रुपये जमा झाले आहेत.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करू इच्छिणाऱ्यांसाठी  खात्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300

सदर देणग्यांना आयकर अधिनियम १९६१ च्या ८० (ग) नुसार आयकर कपातीतून १०० टक्के सूट देण्यात येते. या खात्यात सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा केले आहे.