सेंच्युरी रियॉन कंपनीत  अ‍ॅसीड  अंगावर उडल्याने ४ कामगार होरपळले

सेंच्युरी रियॉन कंपनीत  अ‍ॅसीड  अंगावर उडल्याने ४ कामगार होरपळले

ठाणे (प्रतिनिधी) :

उल्हासनगर शहाड येथील सेंच्युरी रियॉन कंपनीमधील अ‍ॅसीड प्लांटमध्ये अ‍ॅसीड पाईपमधून अ‍ॅसीड अंगावर उडल्याने ४ कामगार होरपळल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेमुळे कामगारवर्गात एकच खळबळ माजली आहे. 

अंकित सुरेंद्र सिंग (२९), पंकज चंद्रमाँ प्रसादसिंग (२१), अनिल अनंता कणसे (२९), चेतन अमित जाधव (३५) असे अ‍ॅसीड अंगावर उडून होरपळलेल्या कामगारांची नावे आहे. बुधवारी सकाळी हे चारही कामगार सकाळच्या सत्रात कामाला आले होते. त्यावेळी एका कामगाराने पाईपचा फ्रेशर वाढविण्यास गेला होता, त्यातच अ‍ॅसीड प्लांटमध्ये मेंटनेसचे काम सुरु आहे. त्यावेळी अचानक अ‍ॅसीड पाईपमधून प्रेशर आल्याने त्यातून अ‍ॅसीड गळती होवून उडाले. त्यावेळी हे चारही कामगार तिथे असल्याने त्यांच्या अंगावर अ‍ॅसीड उडाल्याने होरपळून गंभीर जखमी झाले.  

दरम्यान, चारही जखमींना उपचारासाठी प्रथम सेंच्युरी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यांनतर पुढील उपचारासाठी कंपनीने त्यांना भायखला येथील मसीना हॉस्पिटल येथे दाखल केले आहेत. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उल्हासनगर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करून पुढील तपास सुरु केला आहे.