शिवसंग्रामच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी अविनाश सावंत 

शिवसंग्रामच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी अविनाश सावंत 

रायगड (प्रतिनिधी) :
रायगड जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रांत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले अविनाश हरीभाऊ सावंत यांची शिवसंग्राम संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष तथा मराठा आरक्षणातील एक संघर्षशील नेते अध्यक्ष विनायक मेटे यांच्या आदेशानुसार संघटनेच्या मुंबई येथील मुख्यालयात झालेल्या एका बैठकीत सावंत यांच्यावर संघटनेची रायगड जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी शिवसंग्रामचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य  वस्त्रोद्योग महामंडळ अध्यक्ष तानाजी शिंदे,  प्रदेश सरचिटणीस तथा कोकण पाटबंधारे विकास महामंडळ उपाध्यक्ष विक्रांत आंबरे, प्रदेश उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य खनिकर्म संचालक संदीप पाटील, रायगड जिल्हा चिटणीस तथा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालक अनंत देशमुख, पेण तालुका अध्यक्ष तथा कोकण म्हाडा महामंडळ संचालक आप्पा सत्वे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सावंत यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्थरातून स्वागत करण्यात येत आहे. जिल्हाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर सावंत यांनी रायगड जिल्ह्यात संघटना वाढविण्याला प्राधान्य देणार असल्याचे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.