धिरेश हरड यांना ध्रुव रतन पुरस्कार प्रदान

धिरेश हरड यांना ध्रुव रतन पुरस्कार प्रदान

कल्याण (प्रतिनिधी) : युवा खेलकुद महासंघ सहकार्याने व केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, नीती आयोग यांच्या मान्यतेने दिला जाणारा यंदाचा ध्रुव रतन पुरस्कार कल्याणमधील पांडुरंग प्रतिष्ठानचें संस्थापक-अध्यक्ष डॉ. धिरेश हरड यांना सामाजिक कार्यासाठी नुकताच प्रदान करण्यात आला आहे. प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल हरड यांचे सर्व थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

हरड हे नोकरीनिमित्त कल्याण येथे स्थायिक झाले आहेत. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील शिंदे पाडा हे त्यांचे मुळ गाव आहे. टाटा कॉम्युनिकेशनमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले धिरेश हरड आपल्या पगारातील काही भाग समाजसेवेकरिता सढळ हाताने खर्च करीत समाजाचे देणे फेडण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांना काही दिवसांपूर्वीच त्यांना डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली होती. आता त्यांची ध्रुव रतन पुरस्कार-२०२१ प्रदान करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने पोष्टाने हा पुरस्कार पाठविण्यात आला.

अदिवासी मुलींचे  कन्यादान, नियमित  अन्नदान, बेरोजगार तरुणांना रोजगार, आरोग्य शिबीर-औषध वाटप, महिलांसाठी ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग यासारखे  प्रशिक्षण व स्वय॔रोजगार योजना, अनाथ मुलांना स्वेटर-शैक्षणिक साहित्य वाटप, मोफत कॉम्पुटर प्रशिक्षण यासारखे असंख्य उपक्रम ते आपल्या पांडुरंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवत असतात. कोराना काळातही गरजू नागरिकांपर्यंत स्वखर्चाने धान्य, औषधे पोहोचविण्यासाठी त्यांनी अथक काम केले असून आजही मदत करीत आहेत. आजोबा स्व. शंकरराव शिंदे पाटील व वडील पांडुरंग हरड़ (गुरुजी) यांच्याकडून मिळालेला समाजसेवेचा वारसा आपण व्रतस्थ भावनेतून पुढे चालवीत असल्याची प्रतिक्रिया हरड यांनी व्यक्त केली आहे. आपल्या सर्व कार्याचे श्रेय हरड हे आपले सहकारी, मोठे ब॔धु आप्पा महाराज, आई विमल हरड़, पत्नी दिक्षीता, मुलगी  दिव्या व अंकीता, बहीण संगीता पष्टे यांना देतात.