समाजसेवक धिरेश हरड यांना डॉक्टरेट प्रदान

समाजसेवक धिरेश हरड यांना डॉक्टरेट प्रदान

कल्याण (प्रतिनिधी) : शहरातील  पांडुरंग प्रतिष्ठानचें संस्थापक-अध्यक्ष तथा समाजसेवक धिरेश हरड यांना विश्व मानव अधिकार सुरक्षा आयोग, दिल्ली यांच्यातर्फे सामाजिक सेवेसाठी डॉक्टरेट पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली आहे.

दिल्ली येथील विश्व मानव अधिकार सुरक्षा आयोगाने हरड यांच्या अतुलनीय सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना डॉक्टरेट प्रदान केली आहे. हरड यांनी हा सन्मान नुकतेच निधन झालेल्या आपल्या मामी स्वर्गीय रंजना शिंदे यांना अर्पण करीत असल्याचे म्हटले आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील शिंदे पाडा हे हरड यांचे मुळ गाव, मात्र नोकरीनिमित्त ते कल्याण येथे स्थायिक झाले आहेत. टाटा कॉम्युनिकेशनमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले हरड आपल्या पगारातील काही भाग समाजसेवेकरिता सढळ हाताने खर्च करीत समाजाचे देणे फेडण्याचा प्रयत्न करीत असतात. 

अदिवासी मुलींचे  कन्यादान, नियमित  अन्नदान, बेरोजगार तरुणांना रोजगार, आरोग्य शिबीर-औषध वाटप, महिलांसाठी ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग यासारखे  प्रशिक्षण व स्वय॔रोजगार योजना, अनाथ मुलांना स्वेटर-शैक्षणिक साहित्य वाटप, मोफत कॉम्पुटर प्रशिक्षण आदी माध्यमातून धिरेश हरड सामाजिक कार्य करीत आहेत.  कोराना काळातही गरजू नागरिकांपर्यंत स्वखर्चाने धान्य, औषधे पोहोचविण्यासाठी त्यांनी अथक काम केले. आपल्याला समाजसेवेचा वारसा हा आजोबा स्व. शंकरराव शिंदे पाटील व वडील पांडुरंग हरड़ (गुरुजी) याजकडुन मिळाल्याचे हरड सांगतात. आपल्या सर्व कार्याचे श्रेय हरड हे आपले सहकारी, मोठे ब॔धु आप्पा महाराज, आई विमलताई हरड़, पत्नी दिक्षीता, मुलगी  दिव्या व अंकीता, बहीण संगीता पष्टे यांना देतात.