भातसा कालवा पुलाचे गेट बंद राहिल्याने नेवाडे येथील भातशेतीचे नुकसान !

भातसा कालवा पुलाचे गेट बंद राहिल्याने नेवाडे येथील भातशेतीचे नुकसान !

वासिंद (पंडीत मसणे) : 
भातसा उजव्या कालव्याच्या पुलाचे लोखंडी गेट बंद ठेवल्याने (उचलले न गेल्याने) नेवाडे येथील काही शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सध्या पावसाने जोर धरल्याने सर्वत्र जनजीवन विस्कळीत ह़ोऊन अनेकांचे नुकसान झाल्याचे दिसून येते. वासिंदपासुन ७ ते ८ कि.मी.अंरावर असलेले नेवाडे-उंबरखांड (केल्हे) येथील आदिवासी शेतकऱ्यांचे भातसा कालवा विभाग व्यवस्थापनाच्या दुर्लक्षपणामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. या वसईच्या दिशेने गेलेल्या उजवा कालवा तीर वरिल नेवाडे गावाजवळील असलेल्या पत्री पुलाला असलेले गेट ऐन पावसाळ्यात न उघडल्यामुळे कालव्यामध्ये पाणी तुंबल्याने सदर पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये शिरले. त्यामुळे येथील शेतकरी अनंता ठोंबरे, वालकू ठोंबरे, किसन शेंडे यांनी नुकतीच लागवड केलेल्या भातरोप व शेतीचे नुकसान झाल्याचे येथील ग्रामस्थ अनिल ठोंबरे यांनी सांगितले.

सदर घटनेच्या समस्या निर्वाणबाबत येथील ग्रामस्थांनी भातसा कालवा विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतरही यासंदर्भात कुठलीच अद्याप उपाययोजना करण्यात नसल्याची खंत व्यक्त करीत झालेल्या भातशेतीची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, यासंदर्भात भातसा विभागाचे उप अभियंता ए.एन.उदमले यांच्याशी संपर्क साधला असता सध्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने व येथील गेट अडकल्यामुळे ते उघडण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. तरीही जेसीबीच्या सहाय्याने गेट उघडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.