शहाड येथील रस्त्याचे नरेंद्र पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

शहाड येथील रस्त्याचे नरेंद्र पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या कार्यकाळातील स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रभाग क्र.१५ शहाड येथील मंगेशी पॅराडाईज बिल्डींग ते मातोश्री वेलबाई देवजी हरिया वरिष्ठ महाविद्यालय शहाड या रस्त्याचा भूमिपूजन समारंभ सोहळा नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी स्थानिक पदाधिकारी व सोसायटीतील नागरिक यांचेकडून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी आमदार नरेंद्र पवार यांचे आभार मानण्यात आले. यावेळी भाजपा मोहोने टिटवाळा मंडळ सरचिटणीस संतोष शिंगोळे, अनंता पाटील, प्रभाग क्र.१५ शहाड अध्यक्ष मोहन कोनकर, मंडळ महिला मोर्चा आघाडी अध्यक्षा मनिषा केळकर, मंडळ सचिव निलेश कोनकर, दीपक मोगरे, महिला मोर्चा वार्ड अध्यक्ष वर्षा सुतार, कुणाल मिरकुटे, मच्छिंद्र कोनकर, संजय ढोणे, शशिकांत कशेळकर, नाना कोनकर, राज ढोणे आदि. मान्यवर व परिसरातील सोसायटीचे पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.