कल्याण पूर्वेत भाजपतर्फे शिवजयंती उत्सव साजरा

कल्याण पूर्वेत भाजपतर्फे शिवजयंती उत्सव साजरा

कल्याण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळाच्या वतीने तिसगाव नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कल्याण पूर्व विधानसभेचे आमदार गणपत गायकवाड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी आ. गायकवाड यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. भाजपचे पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, सुभाष म्हस्के, नगरसेविका सुनिता खंडागळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना आमदार गणपत गायकवाड यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. यावेळी शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप तांबे यांनी केले.