ब्रिजिकिशोर दत्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस

ब्रिजिकिशोर दत्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस

कल्याण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित पदाधिकारीची यादी नुकतीच जाहीर झाली असून कल्याणमधील ब्रिजकिशोर दत्त यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे.

ब्रिजिकिशोर दत्त यांचे शिक्षण लंडन विद्यापीठातून एम.बी.ए. झाले आहे. त्यानंतर ब्रिजकिशोर दत्त यांनी सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी समाजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला ते युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी जनतेचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचे काम सलग १० वर्षे केले. त्यांच्या उत्कृष्ठ वक्तृत्वाने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील सुशिक्षित युवकांना काँग्रेस पक्षाविषयी माहिती देऊन त्यांना काँग्रेसशी निगडित केले.  त्यांच्या ह्या कामाची पोचपावती म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी, काँग्रेसचे युवा नेते  राहुल गांधी यांनी ब्रिजकिशोर दत्त यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीने काँग्रेस स्थानिक पातळीवरील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही उत्साह वाढला आहे.