मुंब्रा पोलीस स्टेशन ते गोल्डन डाईन मार्गावर बससेवा सुरू

मुंब्रा पोलीस स्टेशन ते गोल्डन डाईन मार्गावर बससेवा सुरू

ठाणे (प्रतिनिधी) : मुंब्रा-कौसा ते माजिवडा  या मार्गावर परिवहनची बससेवा सुरू करावी अशी मागणी सातत्याने या मार्गावरील प्रवाशांकडून होत होती. या मार्गावरील प्रवाशांची संख्या लक्षात घेवून त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्यावतीने उद्या, दि. १ जून पासून मुंब्रा पोलीस स्टेशन ते गोलडन्‍ डाईज जंक्शन (माजिवडा नाका) मार्ग क्रमांक १४२ या मार्गावर बससेवा सुरू करण्यात येणार आहे. 

मुंब्रा-कौसा, माजिवडा परिसरातील प्रवाशांच्या मागणीनुसार मुंब्रा पोलीस स्टेशन ते गोल्डन डाईज जंक्शन या मार्गावर प्रायोगिक तत्वावर बससेवा सुरू केली जाणार आहे. गोल्डन डाईज जंक्शन (माजिवडा नाका) ते मुंब्रा पोलीस स्टेशन मार्ग क्र. १४२ वर एकूण २४ बसफे-या असणार आहेत. ०६.३५, ०७.०५, ०७.३५, ०८.०५, ०८.३५, ०९.०५, १०.०५, १०.३५, ११.१५, ११.४५, १२.२५, १२.५५, १४.००, १४.३०, १५.००, १५.३०, १६.००, १६.३०, १७.४०, १८.१०, १८.५०, १९.२०, २०.००, २०.३० या वेळेत या बसफे-या धावतील. तर मुंब्रा पोलीस स्टेशन ते गोल्डन डाईज जंक्शन (माजिवडा नाका) मार्ग क्र. १४२ वर एकूण २४ फेऱ्या असणार आहेत. ०७.०५, ०७.३५, ०८.०५, ०८.३५, ०९.०५, ०९.३५, १०.४०, ११.१०, ११.५०, १२.२०, १३.००, १३.३०, १४.३०, १५.००, १५.३०, १६.००, १६.३५, १७.०५, १८.१५, १८.४५, १९.२५, १९.५५, २०.३५, २१.०५ अशा वेळेत या बस धावणार असून प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन सेवेच्या वतीने करण्यात आले आहे.