ऐतिहासिक कल्याण नगरीत शिवजयंती उत्साहात साजरी!

ऐतिहासिक कल्याण नगरीत शिवजयंती उत्साहात साजरी!

कल्याण (प्रतिनिधी) : ऐतिहासिक कल्याण नगरीत शुक्रवारी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डोंबिवली, कल्याण, आंबिवली, टिटवाळा आदी भागात विविध संस्था-संघटनांच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ कल्याण पूर्व च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात कोरोना कालावधीत जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या शासकीय-खाजगी क्षेत्रातील व्यक्तींचा कृतज्ञता सन्मानपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते

सन्मान करण्यात आला. तिसाई देवी मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रारंभी आमदार गणपत गायकवाड, मंडळाचे संस्थापक भगवान भोईर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बासरीवाला ढोलपथकाने तालबद्ध गजरात महाराजांच्या पालखीला मानवंदना दिली. 

याप्रसंगी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराजे साळवे, महापालिकेचे ‘ड’ प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे, ‘जे’ प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पाटील आदींच्या उपस्थितीत पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स-नर्स, पत्रकार आदींना त्यांच्या सेवेचा गौरव म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला माजी आमदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. जगन्नाथ शिंदे भेट देऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाला मंडळाचे विद्यमान अध्यक्ष रुपेश गायकवाड, कार्याध्यक्ष अभिमन्यू गायकवाड, सचिव राजेश अंकुश, विश्वस्त मंडळाचे सदस्य वसंत सूर्यवंशी, नरेंद्र सूर्यवंशी, अनिल घुमरे, के. एल. वासनकर, जरीमरी सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, सुनील गायकवाड, जगदीश लोहाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कल्याण पश्चिमेतील राजमाता जिजामाता चौकात मराठा प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला तर छत्रपती शिवाजी चौकात मराठा सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठा सेनेचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अरविंद मोरे, प्रदेश संघटक रविंद्र कदम, मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश फंड, प्रशांत शिंदे, अॅड. प्रल्हाद भिलारे, हेमलता कदम, विजया शिंदे, प्रभाकर सुर्वे, प्रकाश जाधव, सोमनाथ सावंत, सुनील उतेकर, निलेश भोर, संकेश भोईर, संतोष बोंबले, अॅड. अनिल जरांडे, अशोक लहाने, विकास कदम, नितीन गायकवाड, विकास भोसले, श्याम आवारे आदि उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त एन्वोय हेल्थकेअर फौंडेशन व रेड स्वस्तिक सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने जुने ग्रामपंचायत ऑफिस, पिसवली येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दुर्गा सहदेव तायडे यांच्या हस्ते रिबीन कापून संस्थेच्या फलकाचे अनावरण व आरोग्य शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर, प्रमोद नांदगावकर, प्रभाकर भोईर, मनीषा गांगुर्डे, दीपक जाधव आदीं उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांना सन्मान चिन्ह, तुळशीचे रोप व सन्मानपत्र देवून गौरवण्यात आले. 

सदर शिबिरात हृदयरोग, ईसीजी, रक्तदाब, अंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, मुतखडा, मूत्रमार्ग विकार, हाडांचे विकार, कॅन्सर, सांधे व फुफूसांचे आजार, अस्थमा, नेत्र तपासणी, मोतीबिंदू ऑपरेशन, शुगर, मान-पाठ-कंबरदुखी, प्यारेलीसिस, एचआयव्ही तपासणी करण्यात आली. तसेच सहज योगाची माहिती जिज्ञासूंना देण्य्ता आली. उपजिल्हा रुग्णालय शहापूर, सरस्वती कॉस्माडेट क्लिनिक, आयुर हॉस्पीटल कल्याण, नेत्र आय हॉस्पिटल सदर शिबिरात सेवा देण्यासाठी सहभाग दिला. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतही शुक्रवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. कल्याण पश्चिमेतील  शिवाजी चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महापालिका मुख्यालयातही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

त्याचप्रमाणे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या दालनात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य प्रतिमेस व अर्ध पुतळ्यास देखील पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या समयी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, कर निर्धारक व संकलक  विनय कुलकर्णी, महापालिका सचिव संजय जाधव, क प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे व इतर कर्मचारीवर्ग  उपस्थित  होता. डोंबिवलीतही महापालिकेच्या विभागीय उपायुक्त पल्लवी भागवत यांनी मानपाडा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.