शिवचरित्राचे वाटप करीत कल्याण पश्चिमेत शिवजयंती साजरी 

शिवचरित्राचे वाटप करीत कल्याण पश्चिमेत शिवजयंती साजरी 

कल्याण (प्रतिनिधी) :
मराठा युवक व शिवस्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवजयंती निमित्त कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रस्त्यावरील खडकपाडा चौकात छ. शिवाजी महाराज यांचा जयंती साजरा करण्यात आला. यावेळी शिवचरित्राच्या तीनशे प्रतींचे वाटप करण्यात आले. 

खडकपाडा चौकात शिवाजी महाराजांची प्रतिमा स्थापित करून उपस्थित महिला व बालकांच्या हस्ते त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवजयंती निमित्त बिर्ला कॉलेज रस्त्याने मुरबाड मार्गे शिवनेरीला जाणाऱ्या शिवप्रेमींसाठी दिवसभर पाणी वाटप व भगव्या झेंड्याचे वाटप करण्यात आले. सायंकाळी ढोलताशाच्या गजरात शिवप्रतिमेची परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. बाल शिवाजी आणि मावळ्यांचा वेश परिधान करीत लहान मुलांसह युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर शिवचरित्रावर आधारित चित्रफित भव्य स्क्रीनवर दाखविण्यात आली. बालकालकारांनी पोवाडा व सांस्कृतिक कला सादर केल्या. 

आजी-माजी आमदारांसह सर्वपक्षीय नगरसेवक-नगरसेविका, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बांदकर यांनीही सदर कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दर्शन देशमुख यांच्यासह राम पाटील, राकेश देशमुख, शाम पाटील, रोहित शिंदे, चेतन महाले, निशांत शेटे, संदेश देशमुख, रवि तेलंगे, आरती देशमुख, निकिता झावरे, श्रद्धा, महेश पवार, सागर गोडसे, साहिल साठे आदीं संयोजकांनी परिश्रम घेतले. पोलीस प्रशासनाकडून आम्हाला सहकार्य मिळाल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले.