कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत संविधान दिवस उत्साहात साजरा

कल्याण (प्रतिनिधी) :
भारतीय संविधानाचा ७० वा संविधान सोहळा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मोठया उत्साहात साजरा झाला. कल्याण डोंबिवली महानगरपालिका व बहुजन कर्मचारी परीवर्तन संस्था यांच्या संयुक्त विदयमाने हा सोहोळा आयोजित करण्यात आला होता.
सदर सोहळयाप्रसंगी सकाळी विविध शाळांतील विदयार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तद़नंतर महापालिका मुख्यालयात महापौर विनिता राणे व आयुक्त गोंविंद बोडके यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यावेळी माजी महापौर रमेश जाधव, परिवहन सभापती मनोज चौधरी, उपायुक्त मारूती खोडके, सहाय्यक आयुक्त अरूण वानखेडे, सचिव संजय जाधव, जेष्ठ संविधान अभ्यासक गुणरत्न सदावर्ते, बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था अध्यक्ष, चंद्रकांत पोळ, अन्य पदाधिकारी व महापालिका अधिकारी व कर्मचारी तसेच महापालिका क्षेञातील शाळेतील विदयार्थी व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. महापालिकेच्या आचार्य अञे रंगंमंदिरात जेष्ठ संविधान अभ्यासक गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थिंतांना भारतीय संविधानाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमा प्रंसगी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरूषांच्या प्रतिमांचे वाटप प्रभागक्षेञ अधिकारी यांना करण्यात आले. त्याचप्रमाणे उपस्थित श्रोत्यांसाठी संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा प्रसंगी आयुक्त गोंविंद बोडके, यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.