मराठा क्रांती मोर्चातर्फे शिवराज्याभिषेक दिन ऐतिहासिक कल्याणमध्ये साजरा 

मराठा क्रांती मोर्चातर्फे शिवराज्याभिषेक दिन ऐतिहासिक कल्याणमध्ये साजरा 

कल्याण (प्रतिनधी) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४६ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कल्याणमधील शिवाजी चौकातील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून शनिवारी अभिवादन करण्यात आले.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अॅड. धनंजय जोगदंड, अरविंद मोरे, विलास पाटील, सुभाष गायकवाड, रविंद्र कदम,  प्रविण आंब्रे आदी निवडक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मोरे आणि जोगदंड यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली. तसेच पुष्प अर्पण करून उपस्थित पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी अभिवादन करीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला.

शिवप्रहार संघटनेचे प्रदेश सचिव विलास पाटील आणि मराठा प्रतिष्ठानच्या वतीने रविंद्र कदम यांनी यंदा शिवराज्याभिषेक दिन कोविड -19 (कोरोना व्हायरस) मुळे निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला असला तरी पुढील वर्षी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे यावेळी जाहीर केले.