कल्याण येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा

कल्याण येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा

कल्याण (प्रातिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याण नगरीतील  दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवराज्याभिषेक सोहळा दिनाच्या निमित्ताने मराठा सेनेचे मावळे नतमस्तक झाले.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मराठा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अरविंद मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश संघटक रविंद्र कदम, प्रताप टुमकर, सोमनाथ सावंत, प्रकाश जाधव, दर्शन देशमुख, राकेश देशमुख, संतोष बोंबले आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.