कचोरे येथील सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे खा. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

कचोरे येथील सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे खा. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व येथील प्रभाग क्र. ४५ कचोरे येथील रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रीटच्या कामाचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी खासदारांनी २० लाखांचा निधी दिला आहे.

कल्याण पूर्वेतील कचोरे गावातील सदानंद चौधरी यांच्या घरापासुन ते विनायक चौधरी यांच्या घरापर्यंत रस्ता बनविणे आवश्यक होते. या रस्त्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून पाठपुरावा सुरु होता.. खासदारांनी या कामाची दखल घेत त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. सदर रस्त्याच्या कामाच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. यावेळी खा. डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे, भाजपच्या स्थानिक माजी नगरसेविका रेखा राजन चौधरी, कल्याण पूर्व संपर्क प्रमुख शरद पाटील, उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे, उपशहर अधिकारी कमलाकर चौधरी, शाखा प्रमुख हरीश्चंद्र म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदारांनी रस्त्याच्या कामासाठी २० लाखांचा निधी दिल्याबद्दल मनोज चौधरी यांनी खासदारांचे आभार मानले असून कचोरे येथील स्मशानभूमीच्या नूतनीकरणासाठी ६० लाखांचा निधी देखील दिल्याचे चौधरी यांनी सांगितले. स्थानिक स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांनी देखील खासदारांचे आभार मानत या कामासाठी आपण देखील पाठपुरावा केल्याचे सांगितले.