डोंबिवलीतील सिमेंट क्राँक्रिटच्या रस्त्याचे खा. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

डोंबिवलीतील सिमेंट क्राँक्रिटच्या रस्त्याचे खा. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

डोंबिवली (प्रतिनिधी) : येथील जीएनपी मॉल ते पेंढारकर कॉलेज पर्यत दुरवस्था झालेल्या रस्त्याचे सिमेंट क्राँक्रिट करण्याच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच कल्याण लोकसभा क्षेत्राचे  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महापौर विनिता राणे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवलीचे शहरप्रमुख तथा नगरसेवक राजेश मोरे, स्थायी समितीचे माजी सभापती तथा नगरसेवक दीपेश म्हात्रे, नगरसेवक महेश गायकवाड, नवीन गवळी और कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे यांच्यासह स्थानिक नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खासदार शिंदे म्हणाले की, सुमारे ३ कोटी ८६ लाख रुपये खर्चून या सिमेंट कांक्रिटीच्या रस्त्याचे काम करण्यात येणार असून ते निर्धारित वेळेत पूर्ण होईल. कल्याण-डोंबिवली शहरातील विविध विकास कामांना गती देण्यात आली आहे. यामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. त्यामुळे शहरातील सुरक्षेवर लक्ष ठेवले जाईल व त्याची पोलीस प्रशासनालाही मदत होईल असे शिंदे यांनी सांगितले.