डम्पिंग ग्राऊंड बंद करणाऱ्या केडीएमसीच्या आयुक्तांचा नागरिकांनी केला सत्कार !

डम्पिंग ग्राऊंड बंद करणाऱ्या केडीएमसीच्या आयुक्तांचा नागरिकांनी केला सत्कार !

कल्याण (प्रतिनिधी) : मुंबईकडून रस्त्यामार्गे कल्याणकडे येताना कल्याणच्या प्रवेशद्वारावर गेली अनेक वर्षे दिसुन येणारे आधारवाडी येथील डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याचा मोठा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नुकताच घेतला. या निर्णयामुळे कल्याण पश्चिमेतील नागरिकांची मोठी समस्या सोडविल्याबद्दल कल्याणकरांच्या वतीने काही नागरिकांनी शुक्रवारी आयुक्तांची भेट घेत त्यांचा सत्कार केला.

कल्याण पश्चिम येथे लाल चौकी परिसरात असलेल्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडची क्षमता यापूर्वीच संपली होती. त्यातही या डम्पिंग ग्राऊंडमधील दुर्गंधीचा सामना कल्याण पश्चिमेतील अनेक भागातील  नागरिकांना करावा लागत होता. आता हे डम्पिंग ग्राऊंड बंद केल्यामुळे कल्याणकरांची डम्पिंग ग्राऊंडमधून येणाऱ्या असह्य दुर्गंधीतुन  सुटका झाली आहे. कल्याणमधील नागरिकांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला आहे. 

दरम्यान, कल्याणमधील बांधकाम व्यावसायिक प्रकाश लेले, प्रख्यात दुकानदार ‘अनंत हलवाई’चे प्रफुल्ल गवळी, डॉ. केदार परांजपे, बाजारपेठ परिसरातील ज्वेलर्स पारसमल जैन, रिकबचंद जैन आदींनी शुक्रवारी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन एक महत्वाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार केला.