कुडाळ सोनवडे शाळेत क़्वारंटाईन माजी विद्यार्थ्यांनी केली स्वच्छता

कुडाळ सोनवडे शाळेत क़्वारंटाईन माजी विद्यार्थ्यांनी केली स्वच्छता

कुडाळ (प्रतिनिधी) : करोना लॉकडाऊन काळात मुंबई,अंधेरी मधून प्रवासी पास, वैद्यकीय प्रमाणपत्र व सोशल डिस्टन्स ठेऊन १५ चाकरमानी विद्यार्थी ३० सीटर मिनी बसने प्रवास करीत कुडाळ शहरात दाखल झाले. येथे नगरपरिषदने त्यांची क़्वारंटाईन आरोग्य तपासणी केल्यानंतर सोनवडे गावात दाखल झाले. 

सोनवडे ग्रामपंचायत व त्यांचे नातेवाईक यांच्याशी चर्चा करून त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळा सोनवडे तर्फ हवेली या शाळेच्या वर्ग खोलीत मुले व मुली असे संस्थात्मक क़्वारंटाईन करण्यात आले. हे सर्व विद्यार्थी सोनवडे गावातील मावळते वाडीतील आहेत. हे १५ चाकरमानी विद्यार्थी आणि शाळा यांच्यात माजी विद्यार्थी असे एक अतूट नातं आहे. हे ह्याच गावात जन्मले याच शाळेत शिकले आणि आणि मोठे झाले. कामानिमित्त मुंबईक जावे लागले आणि चाकरमानी झाले. अश्या क़्वारंटाईन झालेले माजी विद्यार्थी या शाळेत वास्तव्यास होते.

गावात आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या क़्वारंटाईन काळात गैरसोयींविषयी तक्रारी न करता सकारात्मक विचार करून, इच्छा शक्तीच्या बळावर गावातील ग्रामस्थ, शाळेतील शिक्षक, स्थानिक गाववाले, पालक व नातेवाईक यांचे विशेष सहकार्य घेऊन या चाकरमान्यांनी शाळेचा सर्व परिसर श्रमदानाने टाकी, शौचालय, प्रसाधनगृह, अंगण झाड लोट केली. पाण्याने लादी धुतली, शाळेची इमारत धुऊन स्वच्छ केली.

या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी शाळेची स्वच्छता करून शाळेचे ऋण फेडण्याचा व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाचे सर्वच  ग्रामस्थांनी, मुंबईकरानी फार कौतुक केले. या स्वच्छता मोहीमेमध्ये पूजा वंजारे, पराग धुरी, वैष्णवी धुरी, अर्जुन धुरी, प्रणाली धुरी, श्रद्धा वंजारे, वैभव वंजारे, शिल्पा धुरी, अमोल धुरी, स्नेहल घोगळे, विनोद धुरी, विनंती धुरी, गीतेश धुरी, साक्षी धुरी, विनायक वंजारे या माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. १४ दिवसानंतर घरी जाताना गावातील सरपंच, उपसरपंच, गावचे पोलीस पाटील व गावातील ग्रामस्थांनी  गुलाब व सॅनेटायजर देऊन शाळेतील पालक व माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.