‘घे भरारी’ पत्रकारिता कार्यशाळा ठाण्यात संपन्न

‘घे भरारी’ पत्रकारिता कार्यशाळा ठाण्यात संपन्न

ठाणे (प्रतिनिधी) :
पत्रकारितेच्या विविध क्षेत्रांची ओळख पत्रकारिता अभ्यासक्रम शिकत असलेल्या मुलाना व्हावी, करिअरची नवीन संधी त्याना मिळावी या हेतूने आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तसेच रोटरी क्लब ऑफ ठाणे अपटाऊन यांच्यावतीने एक दिवसीय ‘घे भरारी’ या कार्यशाळेचे आयोजन ठाण्यातील आनंद विश्व गुरूकुल महाविद्यालयात करण्यात आले होते.

कार्यशाळेची सुरूवात एबीपी माझा न्यूज चॅनेलचे संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते झाली. यावेळी व्यासपीठावर आनंद विश्व गुरूकुल महाविद्यालयाचे सचिव प्रा. प्रदीप ढवळ, रोटरी क्लब ऑफ ठाणे अपटाऊनच्या अध्यक्षा ज्योती चव्हाण, प्राचार्य हर्षदा लिखीते, कोर्स समन्वयक शशिकांत कोठेकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांचे व्याखान झाले. राष्ट्रीय विकास व पत्रकाराची भूमिका यावर त्यानी विचार मांडले. साक्षरेतेचे प्रमाण वाढत चालले असून आता प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मिडीयापेक्षा सोशल मिडिया अधिक प्रभावीपणे काम करू शकेल, असा विश्वास त्यानी व्यक्त केला.

आकाशवाणीचे माजी संचालक डॉ. महेश केळुसकर यानी त्यांच्या भाषणात आकाशवाणीचे कामकाज व भाषेचे महत्व यावर महिती दिली. जनसंपर्क क्षेत्रातील तज्ज्ञ एम.पी. जोशी यानी जनसंपर्क विभागाचे कार्य सांगून केवळ पत्रकारिता पेक्षाही या क्षेत्रातही रोजगाराच्या अनेक संधी, काम करण्याची संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. स्टार माझाचे वृत्तनिवेदक मिलिंद भागवत यानी इलेक्ट्रॉनिक मिडिया, न्यूज चॅनेलचे काम कसे चालते याची माहिती दिली. कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याशी थेट वार्तालापचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्याना खासदारांशी थेट संवाद साधता आला. पत्रकारिता निपक्ष असावी असे सांगून खासदारांची कामे, सरकारी कामाची पध्दत अशा विविध विषयांवर मुलानी विचारलेल्या प्रश्नाना उत्तरे दिली. कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रशिक्षाणीर्थीना प्रशस्तीपत्रक देऊन यावेळी गौरवण्यात आले.