करोना: शाळा-सरकारी कार्यालयांना सुट्टीसाठी याचिका दाखल

करोना: शाळा-सरकारी कार्यालयांना सुट्टीसाठी याचिका दाखल

कल्याण (प्रातिनिधी) : 
चीनसह काही देशांमध्ये करोना वायरसचा फैलाव झाल्याने त्याचा धोका पाहता शाळा व लघु न्यालायल व सरकारी कार्यालयांना पुढील सूचना मिळेपर्यत व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत सुट्टी जाहीर करावी, अशी एक जनहित याचिका मुबई  उच्च न्यालायात शुक्रवारी दाखल करण्यात आली आहे. जोंधळे एज्युकेशन ग्रुपतर्फे ही याचिका सागर जोंधळे यांनी दाखल केली. या बरोबरच धार्मिक स्थळावर नागरिकांनी जाण्याचे टाळावे, अशी सूचना करण्याची मागणी देखील या याचिकेत केली गेली आहे.

जोंधळे एज्यूकेशन ग्रुपचे सागर जोंधळे यांनी दाखल केलेल्या या याचिकेत ब्रिटिशकालीन केलेल्या एपीडेमिक अॅक्ट १८९७ चा हवाला देण्यात आला आहे. या बरोबरच हा कायदा जुना झाला असून यात सुधारणा करण्याचे करण्यात यावी अशी मागणी देखील या मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत करण्यात आली आहे. चीनसह काही देशांनी करोना वायरसची धास्ती घेतल्याने चिंताजन परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर मुंबई उच्च न्यायालय काय  निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांकडे करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे की,  जसा आपत्ती कायदा आहे त्याच धर्तीवर एखाद्या महामारीचे व्यवस्थापन करणारा कायदा आहे. पण तो आता जुना झाला आहे. सद्या ब्रिटिशकालीन एपीडेमिक अॅक्ट १८९७ कायदा लागू आहे. मात्र त्यात त्रुटी असून सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. देशभरात करोना व्हायरस पसरत आहे. यामुळे शाळा, लघु न्यायालये व सरकारी कार्यालयांना पुढील सूचना मिळेपर्यत सुट्टी जाहीर करावी, तसेच या काळात धार्मिक स्थळावर गर्दी करत एकत्र येऊ नये सूचना करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.