बल्याणी येथे सर्फराज रईस यांच्या प्रयत्नाने कोविड लसीकरण

बल्याणी येथे सर्फराज रईस यांच्या प्रयत्नाने कोविड लसीकरण

टिटवाळा (प्रतिनिधी) : सध्याची परिस्थिती पाहता रेल्वे, मॉल अश्या अनेक ठिकाणी लसीकरणाचे डोस अनिवार्य ठरत आहेत. कोरोनाचे संकट अजूनही आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे जेणेकरून पुढील आयुष्यात कोरोनाची लागण होणार नाही हे लक्षात घेता कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून तसेच भारतीय जनता पार्टी टिटवाळा मोहोने मंडळ ब्लॉक उपाध्यक्ष सर्फराज मुन्ना रईस यांच्या प्रयत्नातून नुकतेच मोफत कोव्हिड लसीकरण उपलब्ध करून देण्यात आले होते. 

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सरफराज रईस हे कल्याण डोंबिवली महापालिकेत लसीकरणासाठी पाठपुरावा करीत होते काही दिवसांआधी त्यांच्या पाठपुराव्याला होकार देत लसीकरण मोहीम चालू करण्यासाठी महापालिका सज्ज झाली परंतु प्रभागातील होणाऱ्या लसीकरणचा फायदा घेत रईस यांच्या कार्याचे श्रेय घेतले यामुळे सर्फराज मुन्ना रईस यांनी नाराजगी व्यक्त केली. आयोजित शिबिरात जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी आपला सहभाग दर्शविला. सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला वेळेवर लस उपलब्ध होत नाही यामध्ये नागरिकांचा वेळही खर्च होतो हे लक्षात घेता सर्फराज रईस यांनी नागरिकांसाठी लसीकरण प्रभाग क्रमांक ११ मध्ये उपलब्ध करून दिले आहे. 300 हून अधिक नागरिकांना यावेळी मोफत लसीकरण करून देण्यात आले.

लसीकरणाच्या आदल्या रात्रीपासूनच सर्फराज रईस यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत लसीकरण केंद्रावर योग्य ते नियोजनबध्द कार्य केले. परंतु कामांचे श्रेय इतर पक्षीय कार्यकर्त्याला मिळाल्यामुळे त्यांनी नाराजगी व्यक्त करत बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ..! असा शाब्दिक टोला लगावला आहे. यावेळी संतोष शिंगोळे, विनायक भगत, रोशन गोंधले, भाऊ गोंधले, इरफान शेख, सलमान शेख, महेताब अन्सारी, मुसा रईस, सोहेल शेख, एजाज खान, जहीर अन्सारी, सलीम शेख, जहीर खान, अताउल्लाह शेख, राहुल चांचर, चांद भाई, शाहिदा शेख, सोयबा खान, लक्ष्मी अहिरे, नसरीन सिद्दीकी, सुनीता केरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.