कचोरे येथे ओपन जिमचे लोकार्पण तर दवाखाना नूतनीकरणाचे भूमिपूजन

कचोरे येथे ओपन जिमचे लोकार्पण तर दवाखाना नूतनीकरणाचे भूमिपूजन

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण पूर्वेतील कचोरे प्रभागातील हनुमाननगर कुष्ठरोग वसाहत येथे ओपन जिमचे लोकार्पण आणि कुष्ठरोग दवाखान्याच्या नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. स्थानिक नगरसेविका तथा भाजपच्या कल्याण जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा राजन चौधरी यांच्या प्रयत्नातून सदरची कामे करण्यात आली आहेत. 

याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, कल्याण जिल्हा युवा अध्यक्ष मिहिर देसाई, कल्याण पूर्व मंडळ सचिव संतोष चौधरी, वार्ड अध्यक्षा सुनिता ढेरे, गोपाळ फिरगाणे, कुष्ठरोग वसाहतीचे अध्यक्ष प्रदिप गायकवाड, नागेश कोटुरकर, दत्तू गोळे, अजय कोठारीआदींसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.