डोंबिवली येथील पासपोर्ट सेवा केंद्राचे लोकार्पण संपन्न

डोंबिवली येथील पासपोर्ट सेवा केंद्राचे लोकार्पण संपन्न

डोंबिवली (प्रतिनिधी) : २०१७ पासून सातत्याने पाठपुरावा करुन मंजूर झालेल्या डोंबिवली पूर्व एमआयडीसी परिसरातील डोंबिवली पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचा लोकार्पण सोहळा नुकताच केंद्रीय संचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन स्वरुपात संपन्न झाला. अनेक अडचणींतून मार्ग काढत हे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यात कल्याण लोकसभेचे खा. श्रीकांत शिंदे यांना यश आले.

डोंबिवली एमआयडीसी येथील या पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील लाखो नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी तसेच पासपोर्ट नूतणीकरण आणि पासपोर्ट संबंधित इतर कामांसाठी ठाण्याला जाण्यासाठी होणारा त्रास आणि वेळ वाचणार आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर व इतर उपनगर शहरांतील नागरिकांना या पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

सदर सोहळ्यास मुख्य पोस्टमास्तर जनरल हरीश चंद्र अग्रवाल, ओ.एस.डी. लेफ्टनंट कर्नल अशोक कुमार, प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी, मुंबई डॉ. राजेश गवांडे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, राजेश कदम, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, नगरसेविका प्रमिला पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त जे.डी.मोरे, माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, तालुकाप्रमुख प्रकाश म्हात्रे, भाऊसाहेब चौधरी उपस्थित होते.