रघुवीरनगर येथे वाहतूक सिग्नल व सीसीटीव्ही कॅमेराचे लोकार्पण

रघुवीरनगर येथे वाहतूक सिग्नल व सीसीटीव्ही कॅमेराचे लोकार्पण

डोंबिवली (प्रतिनिधी) : डोंबिवली शहरातील रघुवीरनगर प्रभागातील डॉ. राजेंद्र प्रसाद रोडवर वाहतूक सिग्नल व सीसीटीव्ही कॅमेरा युनिटचे लोकार्पण स्थानिक नगरसेवक तथा शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश गोवर्धन मोरे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. 

रघुवीरनगर-संगीतावाडी प्रभागातील डॉ. राजेंद्र प्रसाद रोड येथील चार रस्त्यावर अपघात होऊ नयेत, तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वाहतूक सिग्नल व सीसीटीव्ही कॅमेरे नुकतेच बसवण्यात आले. या यंत्रणेच्या येथील युनिटचे लोकार्पण शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश गोवर्धन मोरे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, वाहतूक अधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.