ठाण्यात गणपती विसर्जनासाठी कृत्रीम तलावांकड़े भाविकांचा ओघ

ठाण्यात गणपती विसर्जनासाठी कृत्रीम तलावांकड़े भाविकांचा ओघ

ठाणे (प्रतिनिधी) : श्री गणेश विसर्जनाच्या पाचव्या दिवशीही ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण १४,१२३ गणेशमुर्तींसह ९६४ गौरींचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणा-या ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रीम तलावांमध्ये यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांनी पाच दिवसांच्या गणेश मुर्तींचे व गौरीचे विसर्जन केले. 

महापालिकेच्या गणेशमुर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण ६०० गणेश मुर्तींचे महापालिकेच्यावतीने विधीवत विसर्जन करण्यात आले.तर पाचव्या दिवशी ३६६८ नागरिकांनी डिजी ठाणेच्या ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंगद्वारे गणेशमुर्तींचे विसर्जन केले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करत महापालिकेच्या विसर्जन व्यवस्थेला नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार व्यक्त केले आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे महानगरपालिकेच्यावतीने शहरात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहा दिवसाच्या सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्था तयार केली आहे. या व्यवस्थेतंर्गत रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन पालायदेवी, निळकंठ वुड़्स टिकुजीनी वाड़ी-बाळकुम रेवाळे, खारेगाव आदी ठिकाणी एकूण १३ कृत्रीम तलावांची व्यवस्था महापालिकेने उपलब्ध करुन दिली आहे. तर पारसिक रेतीबंदर विसर्जन महाघाट अणि कोलशेत महाघाट याबरोबरच मिठबंदर, कळवा, गायमुख येथे विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावर ही गणेश मुर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

यावर्षी पाचव्या दिवशी १४,१२३ घरगुती गणेशमुर्ती, ९६४ गौरी, ८७ सार्वजनिक गणेश मुर्ती तसेच ६०० स्विकृत मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधेंतर्गत पाचव्या दिवशी ३६६८ नागरिकांनी बुकिंग करून प्रत्यक्षस्थळी विसर्जन केले. दरम्यान, राज्य शासनाच्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन करत महापालिकेच्या विसर्जन व्यवस्थेला नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार व्यक्त केले आहेत.