सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळामुळे कल्याणच्या गणेशोत्सवाला दिशा

सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळामुळे कल्याणच्या गणेशोत्सवाला दिशा

कल्याण (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कल्याण नगरी आधीपासून विविध उत्सवात अग्रेसर आहे. सण कोणताही असो त्याचे विविध मंडळ कार्यकारिणी मार्फत त्याचे योग्य प्रकारे नियोजन तसेच आयोजन करण्यात येते.

दरवर्षी प्रत्येकाच्या घराघरात, प्रभागात , शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो . गेल्या ३१ वर्षापूर्वी प्रकाश पेणकर, प्रदीप नातू, विजय कडव,अभिमन्यू गायकवाड,राजा सावंत,संजय मोरे यांनी कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची स्थापना केली या मंडळाच्या माध्यमातून कल्याण शहरातील मंडळांना भेटी देणे, विविध उपक्रम राबिवने ,गणेश मूर्ती स्पर्धा ,सजावट स्पर्धा ठेवणे आणि उत्कृष्ट मंडळांना पारितोषिक देणे आदी कल्याण शहर गणेशोत्सव महामंडळ करत आले आहे. मात्र तीन वर्षापासून गणेशोत्सव सणाला कोरोना चे सावट आल्यामुळे सरकारचे धोरण पाळत नागरिकांनी गणेशोत्सव सुरू ठेवला आहे. परंतु या गणेशोत्सव काळातच प्रकाश पेणकर यांचे निधन झाल्यामुळे काही अटींसह गणेशोत्सव महामंडळ २०२१-२०२२ अध्यक्ष यश बामा परदेशी यांच्या निर्देशाने उत्सव पार पाडला आहे. यावेळी महामंडळ कार्यकर्ता द्वारे गणेश मूर्तीचे परीक्षण करून यावर्षी मूर्तीवर पारितोषिक ठेवण्यात आले होते .

अशाप्रकारे मिळाली कल्याणमधील मंडळांना दिशा

कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ स्थापन होण्यापूर्वीही कल्याणात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव उत्साहात साजरा होत होता. मात्र मंडळांमध्ये समन्वय नसल्याने तो उत्सव शहराचा लोकोत्सव वाटण्याऐवजी त्या-त्या मंडळांपुरता मर्यादित रहात होता. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या स्थापनेनंतर सर्व गणेश मंडळ पदाधिकारी, प्रशासन, सामाजिक संस्था यांच्यातील समन्वयाचे नवे पर्व सुरू झाले.

स्वत:साठी आखली आचारसंहिता

कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पुढाकाराने सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी स्वत:साठी आचारसंहिता लागू करून घेतली. त्यात गणेशोत्सवात ढोल ताशा , डी जे मुक्त गणेशोत्सव , विसर्जन मिरवणुकीत गुलालाचा वापर करायचा नाही. फुलांच्या पाकळ्या वापराव्यात, महिलांचा सहभाग वाढविणार, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके मिरवणुकीत सहभागी करणे, विसर्जन मिरवणुकीत महामंडळाचे वैद्यकीय कक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव लोकांसाठी आनंदोत्सव कसा होईल? यासाठी प्रयत्न करणे असे नियम स्वत:वर लावून घेत सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या माध्यमातून गणेश मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. त्याचे सकारात्मक परिणाम आजच्या कल्याण शहरातील गणेशोत्सवातून दिसून येत आहेत. कल्याण पूर्वेतील कार्याध्यक्ष जितेंद्र तात्यासाहेब शिर्के आणि प्रमुख सल्लागार वंदना मोरे यांनी कमीत कमी कार्यकर्त्यांनी मंडळाला भेट देणे, परीक्षक पाठवण्याचे निर्देश महामंडळाच्या वतीने दिले होते यासाठी मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. प्रकाश पेणकर यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती भरून निघणार नाही परंतु त्यांनी सुरू केलेला हा प्रवाह कधी थांबवता येणार नाही त्यामुळे आम्ही मोजक्या माणसांसह स्वतः जास्तीत जास्त मंडळाला भेट देऊन कैलासवासी प्रकाश पेणकर यांनी सुरू केलेला प्रवास खंडित होऊ नये यासाठी आम्ही कमी प्रमाणात परीक्षण केले असे कल्याण पूर्व कार्याध्यक्ष जितेंद्र शिर्के म्हणाले.

यावेळी कल्याण पूर्व महिला कार्याध्यक्ष सविता देशमुख, गौरी प्रमुख शैला वाणी, मुख्य सल्लागार वैशाली सोनटक्के, गौरी उपाध्यक्ष सुमती गायकवाड, सचिव शीला राज, सदस्य निशा सिंग, अंजू शुक्ला, रवी निमसे सर आदी कल्याण पूर्व मंडळ पदाधिकारी उपस्थित होते.