कल्याणच्या आधारवाडी जेल कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

कल्याणच्या आधारवाडी जेल कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

कल्याण (प्रतिनिधी)  :  कल्याण शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांचा आकडा पाहता कोळीवली - गांधारी परिसरात भाजपा उद्योग आघाडीच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याअंतर्गत आधारवाडी जेलमधील कर्मचाऱ्यांना केंद्रीय आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. तसेच कैद्यांनाही गोळ्या वाटप करण्यात येणार आहेत. 

माजी आमदार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण शहरात १ लाख नागरिकांना आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्या वाटप करण्यात येत असून भाजपा उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष संजय कारभारी यांच्या पुढाकाराने कोळीवली गाव व ऋतू रिव्हरसाईड या सोसायटीमध्येही या गोळ्यांचे वाटप नुकतेच संपन्न झाले. गोल्डन ओक सोसायटीच्या मागे न्यू अंजनेय सोसायटीच्या समोर नागरिकांना विजेची समस्या सातत्याने असते. त्याठिकाणीही नागरिकांची भेट घेऊन तातडीने समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. नागरिकांनी कोरोना मुक्त कल्याणसाठी काळजी घेतली पाहिजे, आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडा अशी विनंती दरम्यान बोलताना नरेंद्र पवार यांनी केली. यावेळी मेघनाथ भंडारी, ज्योती शर्मा, श्रवण कारभारी, संदीप बोबडे, कृष्णा कपूर, रोशन कारभारी आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, कोरोना योद्धे म्हणून कर्तव्य बजावत असताना कोरोनाबाधित झालेले पोलीस शिपाई राजू लोखंडे हे उपचार करून सुखरूप घरी आले आहेत. त्यांचीही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी घरी जाऊन विचारपूस केली.