घरोघरी जंतनाशक गोळीचे वाटप

घरोघरी जंतनाशक गोळीचे वाटप

कल्याण (प्रतिनिधी) : बालकांमधील रक्तक्षय व कुपोषणास कारणीभूत ठरणारे एक महत्वाचे कारण म्हणजे कृमीदोष आहे. बालकीमध्ये आढळषारा आतडयांचा कुमीदोप हा मातीतून प्रसारित होणा-या जंतांमुळे होतो व कृमीदोष आढळणारी मुले कायम अशक्त, थकलेली दिसतात व त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात व शाळेत गैरहजर रहातात. परिणामी, त्यांची शारिरीक वाढ व बौध्दीक क्षमता खुंटते. म्हणून बालकांना रक्तक्षयापासून तसेच कृमी दोषापासून बचाव करण्यासाठी जंतनाशक औषधी देवून संरक्षीत करणेत येणार आहे.

सदर मोहिमेची अंमलबजावणी वैद्यकीय आरोग्य विभाग, शिक्षण विभाग तसेच महिला व बाल विकास विभाग यांचे समन्वयाने रावविणेत येणार आहे. तरी १ मार्च व मॉप अप दिन ८ मार्च २०२१ या दोन दिवसांच्या कालावधीत आपला सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. आपल्या सर्वाच्या सहकार्याने क.डो.म.पा क्षेत्रात हि मोहिम १०० टक्के यशस्वीपणे राबविणे शक्य होणार आहे.

सदर मोहिम सकाळी ९.०० बा पासून सायं. ४.०० वा पर्यंत सर्व १ ते १९ वर्योगटातील सर्व मुले व मुली यानी नागरी आरोग्य केंद्रात तसेच समुदाय स्तरावर घरोघरी जंतनाशक औषधाची गोळी देण्यात येणार आहे. तरी सर्व सुजाण पालकांना या निवेदनाद्वारे आवाहन करणेत येत आहे की, हा कार्यक्रम यशस्वी करण्यात सक्रीय सहभाग घेवून आपल्या बालकांचे व मुलामुलीचे संरक्षण करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.